सुरेश धस यांच्या अडचणी वाढणार, प्राजक्ता माळीची तक्रार आता महिला आयोगाकडून थेट…

सुरेश धस यांच्या अडचणी वाढणार, प्राजक्ता माळीची तक्रार आता महिला आयोगाकडून थेट…

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या पत्रकार परिषदेनंतर जास्तच चर्चेत आहे. आमदार सुरेश धस यांनी तिच्याबद्दल काही वक्तव्य केली.त्यानंतर राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.  मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वक्तव्य करत असताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत याबद्दल निषेध करत संतापही व्यक्त केला आहे.

राज्य महिला आयोग अॅक्शन मोडमध्ये

तसेच प्राजक्ताने राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राज्य महिला आयोग अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. प्राजक्ता माळीने मुंबई पोलिस आणि बीड पोलिसांना अर्ज दिला आहे. प्राजक्ता माळी यांच्या तक्रारीवर आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचंही सांगिलं आहे.

प्राजक्ता माळीची तक्रार आता थेट…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील पोलिसांना याबद्दलचे निर्देश दिले आहेत. तसेच संपूर्ण घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. प्राजक्त माळी हे एक निमित्त आहे. पण आज मोठ्या प्रमाणात महिलांचं चारित्र्य हनन केलं जात आहे, असे रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे. तसेच प्राजक्ता माळीने त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा जनता दरबार असल्यामुळे बोलणं होवू शकलं नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.

रुपाली चाकणकरांचे पोलिसांना चौकशीचे निर्देश

रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्राजक्ता माळीचा अर्ज महिला आयोगाला प्राप्त झाला आहे. दोन दिवसांमध्ये महिला आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी शहानिशा करून हा अर्ज मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाला पाठवला आहे. त्याचसोबत त्याची एक प्रत बीड पोलिस अधिक्षक आणि सायबर क्राईम यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. सायबरच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल कलेल्या अश्लिल विधानांची चाचपणी व्हावी आणि कारवाई व्हावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.”

असं सांगत रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग प्राजक्ता माळीच्या तक्रारीची दखल घेत असून पोलिसांनाही याबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी सांगितले असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.

“अनेक महिला तक्रार करायला घाबरता”

दरम्यान “संबंधित तक्रार अर्जाची, घटनेची चौकशी करावी आणि तसेच त्याबद्दल केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तक्रारी आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या बदनामीमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. सोशल मीडियामुळे फसवणूक आणि वाढलेल्या गुन्हेगारीची संख्या वाढली आहे. आम्ही अनेक उपाययोजना राबवत आहोत तरी त्यात काही यश आले नाही. अनेक महिला तक्रार करायला घाबरता.” असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

का नाही झालं सलमान खानचं लग्न? अभिनेत्याच्या वडिलांकडून मोठा खुलासा का नाही झालं सलमान खानचं लग्न? अभिनेत्याच्या वडिलांकडून मोठा खुलासा
Salman Khan Marriage: सलमान खानचं रिलेशनशिप स्टेटस बॉलिवूडपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा असतो आणि आजही तो एलिजिबल बॅचलर मानला जातो. सलमान...
सुब्रमण्यनवर संतापून ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ म्हटलेली दीपिकाही अनुभवला असा काही अनुभव
विवाहित कुमार सानू यांच्यासोबत पत्नीसारखी राहायची ही प्रसिद्ध अभिनेत्री; 5 वर्षे केलं डेट
सचिन तेंडुलकरची लेक की सौरव गांगुलीची लेक, कोण आहे उच्च शिक्षित?
बॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्रीने जिने लग्नाआधी क्रिकेटरच्या मुलीला दिला जन्म, मात्र त्याने सोडली साथ
दिग्दर्शकाने कट बोलल्यावरही किस करत राहिला; ‘त्या’ व्हिडीओमुळे वरूण धवन चांगलाच ट्रोल
‘आताच उमराह केला अन् आता मंदिरात..’; सिद्धिविनायक मंदिरात गेल्याने हिना खान ट्रोल