नवीन वर्षात प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; प्राजक्ताचा दिसला हटके लूक
काहीच तासांनी 2024 वर्ष संपून 2025 वर्ष सुरु होणार आहे. तसेच नवीन वर्षात अनेक हिंदी-मराठी नवीन चित्रपटही पाहायला मिळणार आहेत. त्यातील काही चित्रपटांची नावे समोरही आली आहेत. अशातच आता आणखी एका मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याची एक झलकही पाहायला मिळणार आहे.
नवीन वर्षात प्राजक्ता माळीचा नवा चित्रपट
नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या सिनेमाचं नाव आहे ‘चिकी चिकी बुबूम बुम’. या सिनेमात प्राजक्ता माळी, स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे आणि हास्यजत्रेची टीम असणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतेच रिलीज झालं असून पोस्टरवरून हा सिनेमा कॉमेडी असल्याचं म्हटलं जात आहे.
या आगामी सिनेमाची पहिली झलक वर्षाखेरीस शेअर केली आहे. पोस्टरची पहिली वहिली झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
चित्रपटात स्वप्नीलचा आणि प्राजक्ताचा हटके लूक
या सिनेमात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळीसह प्रसाद खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही कलाकार मंडळी देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे पोस्टरमध्ये स्वप्नीलचा आणि प्राजक्ताचा हटके लूक पाहायला मिळत आहे.
तसेच यातील कलाकार हे घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्यामुळे नक्की या चित्रपटाची कथा काय असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच आहे.
चित्रपटातील प्राजक्ता माळीचा लूक चर्चेत
दरम्यान या सिनेमातील प्राजक्ता माळीच्या लूकची चर्चा सर्वत्र होत आहे. सिनेमातील प्राजक्ताचा लूक हा फारच हटके असून त्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे.
चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला रिलीज
‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकर यांनी केलं आहे.
चित्रपटाची कथा मात्र अजूनही गुलदस्त्यात असली आहे. पण चित्रपटातील कलाकार मंडळी पाहता हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी सर्वांना आशा नक्कीच आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List