4300 भिकाऱ्यांवर पाकिस्तानची कारवाई; सौदीच्या इशाऱ्यानंतर ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले
पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातील 4,300 हून अधिक भिकाऱ्यांना ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले आहे. सौदी अरेबिया व अन्य आखाती देशांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वी आखाती देशांनी त्यांच्या देशात पाकिस्तानमधून येणाऱ्या भिकाऱ्यांमुळे समस्या निर्माण होत असल्याची तक्रार दाखल करत पाकिस्तानला सुनावले होते.
धार्मिक यात्रेच्या नावाखाली पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर सौदी अरेबियाने चिंता व्यक्त केली होती. तसेच अशा लोकांना आखाती देशात येण्यापासून रोखण्यासाठी कारवाई करण्यास सौदी अरेबियाने पाकिस्तानला सांगितले होते, अन्यथा त्याचा दोन्ही राष्ट्रांमधील धार्मिक आणि परस्पर संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा इशारा सौदी अधिकाऱ्यांनी दिला होता. सौदी अरेबियाने दिलेला इशारा म्हणजे पाकिस्तानसाठी लाजीरवाणी बाब होते. त्याची दखल घेत पाकिस्तानने त्यांच्या देशातील 4,300 भिकाऱ्यांना एक्झिट पंट्रोल लिस्टमध्ये (ईसीएल) टाकले आहे.
दोन महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, परदेशात अटक करण्यात आलेले 90 टक्के भिकारी हे पाकिस्तानातून येत असल्याचे उघड झाले होते. सौदी अरब आणि इराक या दोन देशांनी पाकिस्तानातून येणाऱ्या भिकाऱ्यांमुळे चिंता व्यक्त केली होती.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन रझा नख्वी यांनी बुधवारी सौदी अरबचे मंत्री नासेर बिन अब्दुल अजीज अल दाऊद यांना पाकिस्तानने उचललेल्या पावलांची माहिती दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List