मुंबईतील 700 चौरस फुटांचा मालमत्ता कर माफ करावा;अजय चौधरी यांची मागणी
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी यांनी मुंबईतील घरांच्या मालमत्ता कराबाबतचे शासनाचे लक्ष वेधले. मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकावे आणि मराठी माणसांना मुंबईतील घरे विकून विस्थापित व्हावे लागू नये, यासाठी महाविकास आघाडीतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना आणि निवासी गाळ्यांना मालमत्ता कर माफ केला होता. आता सद्यस्थिती बघता 700 चौरस फूटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची मागणी अजय चौधरी यांनी केली आहे.
सध्या मुंबईत जुन्या चाळींच्या आणि म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासात 550 ते 650 चौरस फुटांचे घर उपलब्ध होणार आहे. तसेच अभ्युदय नगर येथेही पुनर्विकास प्रकल्पात 650 पेक्षा जास्त चौरस फुटांचे घर मिळणे प्रस्तावित आहे. या पुनर्वसन प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना मालमत्ता करण भरणे कठीण होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करता मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 700 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणे आवश्यक आहे, असे अजय चौधरी यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List