Mumbai Boat Capsized: मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणाऱ्या दोन बोटीत धडक, बोट उलटली

Mumbai Boat Capsized: मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणाऱ्या दोन बोटीत धडक, बोट उलटली

Mumbai Boat Capsized: मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यानंतर ही बोट उलटली. या दोन्ही प्रवासी बोटी होत्या. त्यामधून ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवित हानी झाली नाही. हा अपघात कसा झाला? त्याचे कारण समोर आले नाही.

दोन बोटींमध्ये टक्कर

मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये टक्कर झाली. त्यानंतर बोट उलटली. प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते. त्यामुळे सुदैवाने कोणताही जीवीत हानी झाली नाही.

उलटलेल्या नीलकमल बोटीत ३० ते ३५ प्रवासी

उलटलेल्या बोटीचे नाव नीलकमल असे आहे. या बोटीमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. उरण, कारंजा परिसरात बोट उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलिसांच्या आणि स्थानिक माछीमारांच्या बोटीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोटी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी बचावकार्य सुरु केले.
दरम्यान, या घटनेची माहिती आमदारांना मिळाली. त्यानंतर यासंदर्भात सभागृहात प्रश्न विचारण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रात मराठी कलाकारांवर अन्याय का? दादासाहेब फाळकेंना भारतरत्न न देण्यावरून बाबासाहेब पाटलांची नाराजी महाराष्ट्रात मराठी कलाकारांवर अन्याय का? दादासाहेब फाळकेंना भारतरत्न न देण्यावरून बाबासाहेब पाटलांची नाराजी
दादासाहेब फाळके यांचा ‘भारतरत्न’साठी विचार का केला नाही? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्या अशी मागणी...
पार्टीत धर्मेंद्रने या कलाकाराच्या कानशिलात लगावली, नंतर थेट…
तब्बल 49 वर्षांनंतर ‘शोले’ चित्रपटातून हटवलेला ‘तो’ सीन व्हायरल, फोटो आले समोर
माझं त्याच्याशी काही घेणं-देणं नाही, गोविंदाची पत्नी अजूनही नाराज ?, कृष्णाबाबत म्हणाली…
EPFO खातेधारकांसाठी खुशखबर! नवीन वर्षात मिळणार ATM आणि मोबाईल अ‍ॅपची सुविधा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक कशी? सुप्रिया सुळे यांचा सवाल
Santosh Deshmukh Case – सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला कोणी आश्रय दिला? सुरक्षा कोणी दिली? अंबादास दानवे यांचा सवाल