Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर ब्रिजचा गर्डर टाकण्यासाठी मध्यरात्री विशेष ब्लॉक

Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर ब्रिजचा गर्डर टाकण्यासाठी मध्यरात्री विशेष ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेचा दि. २१/२२.१२.२०२४ (शनिवार/रविवार मध्यरात्री) आणि दि. २२/२३.१२.२०२४ (रविवार/सोमवार मध्यरात्री) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागांत अप आणि डाउन धीम्या आणि जलद मार्गांवर, पाचव्या आणि सहाव्या मार्गावर काम करेल. एकात्मिक विशेष रहदारी आणि पॉवर ब्लॉक्स परीचालीत केला जाईल ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:-

ब्लॉक क्र. १

  • ब्लॉक दिनांक : २१/२२.१२.२०२४ (शनिवार/रविवार रात्री)
  • ब्लॉकची वेळ: ०१.०० ते ०४.३० पर्यंत

गर्डर लाँच करण्यासाठी ब्लॉक:

  • तिसरा नवीन पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान
  • उल्हासनगर येथे १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)
  • कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान लेव्हल क्रॉसिंग (एलसी) गेटच्या जागी आरओबी
  • नेरळमध्ये ६ मीटर रुंद एफओबी

ट्रॅफिक ब्लॉक विभाग आणि कालावधी:

  • डोंबिवली-कल्याण अप आणि डाउन धिमा मार्ग (प्लॅटफॉर्मसह – क्रॉसओवर वगळता)
  • डोंबिवली-कल्याण अप आणि डाउन जलद मार्ग (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओव्हर वगळता)
  • कल्याण – अंबरनाथ अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्ग (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओव्हर वगळता)
  • पाचव्या आणि सहाव्या ओळी (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता)

ब्लॉकमुळे होणारे परिणाम:-

  • मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
    ट्रेन क्रमांक 11087 डाउन वेरावळ- पुणे एक्सप्रेस भिवंडी स्थानकावर १० मिनिटांसाठी नियमित केली जाईल

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण:

  • खालील डाऊन गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गिकेवर वळवण्यात येतील:
  • ट्रेन क्र. 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्सप्रेस
  • ट्रेन क्र. 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस

ईशान्य दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कल्याण आणि दिवा/ठाणे स्थानकांदरम्यान ६व्या मार्गावर वळवण्यात येतील:

  • ट्रेन क्रमांक 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • ट्रेन क्र. 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 20104 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • ट्रेन क्र. 11402 बल्हारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस

दक्षिण-पूर्व दिशेकडून येणाऱ्या अप गाड्या कर्जत- पनवेल मार्गे वळवल्या जातील आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवल्या जातील:

  • ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • ट्रेन क्र. 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्सप्रेस
  • ट्रेन क्र. 11140 हॉस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

ब्लॉक क्रमांक २

  • ब्लॉक दिनांक: दि. २२/२३.१२.२०२४ (रविवार/सोमवार रात्री)
  • ब्लॉकची वेळ: ०२.०० ते ०५.३० पर्यंत

गर्डर लाँच करण्यासाठी ब्लॉक: तिसरा नवीन पत्रीपुल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान.

ट्रॅफिक ब्लॉक विभाग आणि कालावधी:

  • डोंबिवली -कल्याण अप आणि डाउन धीमी लाईन (प्लॅटफॉर्मसह – क्रॉसओवर वगळता)
  • डोंबिवली- कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता)
  • पाचव्या आणि सहाव्या मार्गावर (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता)

ब्लॉकमुळे होणारे परिणाम:-

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन

  • ट्रेन क्र. 18030 अप शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. 12810 अप हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस अनुक्रमे टिटवाळा आणि खडवली स्थानकांवर १५ मिनिटांनी नियमित केली जातील.
    ट्रेन क्रमांक 12132 अप साईनगर शिर्डी – दादर एक्स्प्रेसही उशिराने धावणार आहे.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन:

  • गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवली जाईल.
  • गाडी क्रमांक 11020 वगळता सर्व सहाव्या मार्गावरील मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालतील.

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे संचालन: ब्लॉक कालावधीत कल्याण आणि ठाणे विभागांमध्ये उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

शनिवार दि. २१.१२.२०२४ रोजी खालील उपनगरीय गाड्या विस्तारित /शॉर्ट टर्मिनेटेड केल्या जातील :

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटून कसारापर्यंत चालेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.४२ वाजता सुटेल आणि ती ठाणेपर्यंत चालेल.

शनिवार दि. २१.१२.२०२४ रोजी खालील उपनगरीय गाड्या रद्द राहतील:

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बदलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटेल
  • बदलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल बदलापूर येथून २१.५८ वाजता सुटेल
  • अंबरनाथ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून २२.१५ वाजता सुटेल
  • टिटवाळा – ठाणे लोकल टिटवाळा येथून २३.१४ वाजता सुटेल

रविवार दि. २२.१२.२०२४ रोजी खालील उपनगरीय गाड्या शॉर्ट ओरीजनेट असतील :

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- आसनगाव ही आसनगाव येथे ०८.०७ वाजता येणारी लोकल कल्याण येथून सुटेल.
    टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.४० वाजता येणारी लोकल ठाणे येथून सुटेल.

रविवार दि. २२.१२.२०२४ रोजी खालील उपनगरीय गाड्या रद्द राहतील

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अंबरनाथ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०२, ०५.१६ आणि ०५.४० वाजता सुटणारी,
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०.०८ वाजता सुटते व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी तसेच
  • अंबरनाथ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी अंबरनाथ येथून ०३.४३ आणि ४.०८ वाजता सुटणारी,
    कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कर्जत येथून ०२.३० आणि ०३.३५ वाजता सुटेल आणि
    कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कल्याण येथून ०४.३९ वाजता सुटेल
  • दक्षिण-पूर्व दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.३० वाजता सुटते.
  • ईशान्य दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटेल.

टीप :

  1. मेल/एक्स्प्रेस गाड्या, विशेष गाड्या असल्यास, उशिरा धावणाऱ्या किंवा नंतरच्या तारखेला सूचित केलेल्या गाड्या देखील त्यानुसार नियमन/शॉर्ट टर्मिनेटेड केल्या जातील किंवा त्यांच्या संबंधित गंतव्यस्थानी उशीरा पोहोचतील.
  2.  प्रमुख ब्लॉक्स व्यतिरिक्त, इतर शॅडो ब्लॉक्स देखील कल्याण-अंबरनाथ विभागावर चालवले जातील.
  3. हे ब्लॉक्स प्रवाशांच्या आणि देशाच्या हितासाठी केले जातात. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर “मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक अडथळ्यांना पार करत अखेर...
अखेर तो क्षण आलाच.. ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे देणार प्रेमाची जाहीर कबुली?
“पुढच्या जन्मी माझे पती बनू नका..”, गोविंदाच्या पत्नीने जोडले हात; संसारात सर्वकाही आलबेल नाही?
तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी
Photo – मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरेचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज
मध्य प्रदेशात मंदिरांच्या तोडफोडीवरून वातावरण तापले; सराफा बाजार बंद, हिंदू जैन समाजाचे आरोपप्रत्यारोप
गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र