‘काम मिळेल पण माझ्यासोबत…’, जेव्हा सुपरस्टारने अभिनेत्रीसमोर ठेवली विचित्र अट, आता कसं आयुष्य जगतेय अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कामाच्या नावाखाली अनेक अडतणींना तोंड दिलं आहे. अनेक वर्ष मनात असलेल्या भीतीमुळे अभिनेत्रींनी मौन धरलं होतं. पण आता अभिनेत्री आलेल्या वाईट अनुभवांबद्दल सांगत असतात. या अभिनेत्रींच्या लिस्टमध्य ‘किसना’ फेम अभिनेत्री देखील आहे. अभिनेत्री ईशा शरवानी हिने देखील करियरच्या सुरुवातील वाईट अनुभवांचा सामना केला आहे. क्यूट आणि सुंदर दिसणारी ईशा आता झगमगत्या विश्वापासून दूर आहे. ‘करीब करीब सिंगल’ सिनेमानंतर अभिनेत्री कोणत्याच सिनेमात झळकली नाही.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यामागचं कारण देखील सांगितलं आहे. अभिनेत्रीने सांगितलं, कशा प्रकारे एका अभिनेत्याने अभिनेत्रीला शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली होती. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड निराश झाली होती.
घटलेली घटना आठवत ईशा म्हणाली, ‘एका अभिनेत्याची अट ऐकून मला मोठा धक्का बसला होता.’ शिवाय त्यावेळी अभिनेत्री प्रचंड घाबरली देखील होती. जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आलं, ‘अभिनेत्याने मागणी केल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय होती?’
यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी हळू-हळू माझी जागा सोडली आणि तेथून पळ काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिनेत्याला कॉल केला आणि नकार दिला. मला शारीरिक वेदना नको होत्या. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात एकच चाललं होतं, की उठून पळावं.’ असं अभिनेत्री म्हणाली.
‘किसना’ सिनेमात अभिनेत्रीला कशी मिळाली भूमिका?
यावर ईश म्हणाली, ‘मी सेटवर आई दिक्षा सेठ हिच्यासाठी डिव्हिडी प्ले करण्यासाठी गेली होती. तेव्हा ‘किसना’ सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष घाई यांनी मला पाहिलं आणि त्यांना माझा डान्स प्रचंड आवडला. त्यानंतर मला सिनेमात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा शरवानी हिची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, ईशा आज झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, अभिनेत्री केरळ याठिकाणी आई दिक्षा सेठ यांच्या ॲकेडमीमध्ये मुख्य डान्सर आहे. ईशा एका उत्तम डान्सर आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List