राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना, तोफांच्या सरावादरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्याने 2 जवानांचा मृत्यू
राजस्थानमधील बीकानेरमध्ये महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. तोफांचा सराव सुरू असताना अचानक बॉम्ब स्फोट झाल्याने 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जवान गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमधील चार्ली सेंटरमध्ये हा अपघात झाला आहे. जवानांच्या माध्यमातून तोफांचा सराव सुरू होता. याच दरम्यान बॉम्बचा भयानक स्फोट झाल्याने दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला सुरतगड येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज तक या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List