वामन शंकर मराठे ज्वेलर्सवर दरोडा, पाच कोटींच्या दागिन्यांवर डल्ला
स्टेशन परिसरात असलेल्या वामन शंकर मराठे ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी दुकानाचे शटर उचकटले व तब्बल 5 कोटी रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. हे दोघेही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
■ मराठे ज्वेलर्स दुकानावर सोमवारी मध्यरात्री दोन चोरट्यांनी दरोडा घातला. या चोरट्यांनी परिसराची रेकी करत दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर त्यांनी दुकानात घुसून 5 कोटी रुपये किमतीचे अंदाजे 5 किलो सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
■ दोघेही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. याप्रकरणी वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे मालक यांच्या तक्रारीनुसार नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
■ सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून 24 तास गजबजलेल्या परिसरात दरोडा पडल्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमले
गुन्हा दाखल झाल्यानंतर चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पोलिसांकडून तपशील मोजमाप सुरू आहे. तसेच या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके नेमली आहेत. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी सीसीटीव्ही, तांत्रिक यंत्रणा व गुप्त माहितीदाराच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List