‘शिवा’ मालिकेत अजब ट्विस्ट; प्रेक्षकांना जे नको होतं अखेर तेच घडलं
'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. कठीण प्रसंगांमध्येसुद्धा एक नवी सुरुवात करत शिवा घर सोडून सध्या गॅरेजमध्ये राहण्याचा निर्णय घेते. या नाट्यमय वळणावर शिवा तिच्या समोरील संघर्षाला आणि संकटाना सामोरं जात आलेल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचं ठरवते.
तणाव वाढत असताना आशू शिवाबद्दलच्या त्याच्या खऱ्या भावना जाणून घेण्यासाठी चंदनसमोर उभा ठाकतो. दरम्यान, दिव्या परिस्थितीचा फायदा घेत चंदनला तिचं गुपित उघड करू नये म्हणून भावनिक ब्लॅकमेल करते.
शिवा आशूला पाठिंबा देत राहते, पण दबावामुळे त्यांचं नातं कमकुवत होतं. दुसरीकडे कीर्ती आणि सुहास हे दोघं शिवा आणि आशूमध्ये दुरावा निर्माण करण्याचा कट रचतात आणि नेहाला आदर्श सून म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात.
शिवा तिच्या वाढदिवशी आशूसोबत दिव्याच्या भेटीबद्दल प्रश्न विचारते, पण दिव्या चंदनच्या मदतीने खोटं सांगते. घरात आशूच्या आजारपणामुळे आणि नेहाच्या येण्याने वाद निर्माण होतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List