रितेशने जिनिलियासोबत मध्यरात्री अचानक केलं होतं ब्रेकअप; रात्रभर जिनिलियाची झाली होती अशी परिस्थिती
बॉलिवूडमधलं सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख. यांची जोडी बॉलिवूडप्रमाणे प्रत्येक मराठी चाहत्यांच्या मनातही नंबर वनच आहे. त्यांचे रिल, फोटो, व्हिडीओ सर्वांवर चाहते भरभरून प्रेम करताना दिसतात. या दोघांची प्रेम कहाणी ते लग्न हा प्रवास सर्वांनाच आकर्षित करतो. यांच्यामधील प्रेम आजही असच असल्याचे अनेक प्रसंगामधून दिसून येतं. पण याच नात्यात एकदा ब्रेकअपचा क्षणही आला होता.
सोशल मीडियावरही जिनिलिया आणि रितेशचे गंमतीशीर तसेच रोमँटिक व्हिडीओ पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहितीय का? रितेशने जिनिलियासोबत ब्रेकअप केले होते. याबद्दल स्वत: जिनिलियानेच एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. एक मेसेज पाठवत रितेशने जिनिलिया सोबत ब्रेकअप केलं होतं.
रितेशने जिनिलियासोबत का केला होता ब्रेकअप?
एका मुलाखतीत जिनिलियाने सांगितले की,”जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. त्यावेळेस रितेशने ‘आपले नाते संपले’ असा मेसेज केला. रितेशने मला रात्री उशीरा 1 वाजता पाठवला. मेसेज पाठवून तो झोपी गेला. पहाटे 2.30 वाजता मी मेसेज वाचला आणि उदास झाले. नेमके काय झालंय मला कळेना. असे कसे कोण वागू शकतं? असा विचार मी करू लागले.”
जिनिलिया रात्रभर होती अस्वस्थ
जिनिलियाने पुढे सांगितले की, “सकाळी 9 वाजेपर्यंत मी अस्वस्थ होते. तो सकाळी उठला आणि रात्री आपण काय केलंय हे त्याच्या लक्षातच नव्हते. सकाळी त्याने मला फोन केला आणि काय करतेयस? असं विचारलं. यावर मी रितेशला म्हटलं की मला तुझ्याशी बोलायचं नाहीय. यावर रितेशने विचारलं, नेमके काय झालंय? पुढे मी म्हटलं की, तू असं वागतोयस जसं काही झालेच नाहीय?” असं म्हणत तिने रितेशवर नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर जिनिलियाने त्याला ब्रेकअपच्या मेसेजबाबत सांगितले, तेव्हा रितेशला आठवलं आणि तेव्हा त्याने तिला स्पष्ट केलं की रितेशने जिनिलियासोबत तो प्रँक केला होता. रितेशने असं स्पष्ट करताच अशी मस्करी कोण करते, असा प्रश्नही त्यावेळेस जिनिलियाने विचारल्याचं तिने सांगितले.
दरम्यान ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य करते आणि पुढेही करत राहील यात शंका नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List