चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, गंभीर जखमी झाल्याने तरुणीचा मृत्यू
चार्जिंग सुरू असताना मोबाईलवर बोलणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. फोनवर बोलत असतानाच कानाजवळ मोबाईलचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील चंबा येथील डलहौसी येथे ही घटना घडली. किरण असे पीडित तरुणीचे नाव आहे.
सलूनी भागातील बिचुनी गावातील रहिवासी असलेल्या किरणने फोन चार्जिंगला लावला होता. चार्जिंग सुरू असतानाच तिने इंटरनेट कनेक्शन सुरू केले आणि ती फोनवर बोलत होती. यावेळी तिच्या कानाजवळ स्फोट झाल्याने गंभीर दुखापत झाली.
स्फोटाचा आवाज ऐकून किरणची आई मुलीच्या खोलीत धावली. कुटुंबीयांनी किरणला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिला गंभीर इजा झाल्याने तेथून कांगडा येथील तांडा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर किरणचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List