जिंदाल पोर्ट कंपनीत एलपीजी वायुगळती प्रकरण; चौकशी समितीकडून घटनास्थळाची पाहणी
जिंदाल पोर्ट कंपनीत झालेल्या वायुगळतीनंतर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेत पालकांची बैठक होणार आहे.या बैठकीत गॅस प्रकल्प बंद करावा अशी मागणी पालक करणार आहेत.
जयगड येथील जिंदाल पोर्टमध्ये 12 डिसेंबर रोजी एलपीजी वायुगळती झाली. त्यामुळे कंपनीच्या शेजारी असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर मधील 68 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती.या विद्यार्थ्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारानंतर दोन दिवसांनी त्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले होते.मात्र कालपासून विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 19 विद्यार्थी आणि गावातील दोन प्रोढ व्यक्तींना त्रास होऊ लागल्याने यासर्वांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वायुगळती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यासमितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आणि सचिव प्रांताधिकारी जीवन देसाई आहेत. या समितीने घटनास्थळी भेट दिली.दुर्घटना घडलेली शाळा,एलपीजी टॅंकरचे पार्किंग याची पहाणी केली.दरम्यान दुर्घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा प्रशासननाने पोर्ट मधील एलपीजीजे काम बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळेत पालकांची बैठक
सोमवारपासून माध्यमिक विद्यामंदिरात विद्यार्थी येऊ लागले आहेत.आजही 57 विद्यार्थी शाळेत आले होते. बुधवारी शाळेत पालकांची बैठक होणार आहे. शाळेपासून जवळ एलपीजीचा हा प्रकल्प आहे. भविष्यात दुर्घटना घडण्याची भीती असल्याने कंपनी बाबत पालक आक्रमक भूमिका घेणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List