मल्टी स्टारर ‘मु.पो.बोंबिलवाडी’चा धम्माल ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांना खळखळून हसवणार

मल्टी स्टारर ‘मु.पो.बोंबिलवाडी’चा धम्माल ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांना खळखळून हसवणार

मल्टी स्टारर ‘मु पो बोंबिलवाडी’ चित्रपटाचे पोस्टर जेव्हापासून रिलीज झालं होतं तेव्हापासून या चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वच प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहतं होते. अखेर प्रेक्षकाची प्रतीक्षा संपली असून ‘मु पो बोंबिलवाडी’चा धम्माल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा हा नवा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत ट्रेलरचे प्रदर्शन झाले.

‘मु पो बोंबिलवाडी’चा धम्माल ट्रेलर

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी ही मराठी मनोरंजनसृष्टीतील नावाजलेली लेखक-दिग्दर्शकाची जोडी. ‘आत्मपॅम्प्लेट’ पासून त्यांनी चित्रपटनिर्मितीक्षेत्रात देखील प्रवेश केला. त्यांच्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांने गौरवण्यात आले. आता मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांचा ‘मु.पो. बोंबिलवाडी – 1942 एका बॉम्बची बोंब’ हा एक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय. मुख्य म्हणजे यातील कलाकारांना पाहूनच अंदाज येतो की प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक मेजवानी असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prashant Damle (@damleprashant)

2001 साली परेश मोकाशी यांचे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक रंगभूमीवर आले होते ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता याच नाटकाचे माध्यमांतर केलं गेलं असून मोकाशी त्याच नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले असून निर्मितीची धुरा मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक यांनी सांभाळली आहे.

चित्रपटात तगडी स्टारकास्ट अन् गमतीशीर प्रसंग

प्रशांत दामले, वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. प्रशांत दामले यात ‘हिटलर’ ची भूमिका साकारत आहेत. एकंदरितच त्यांच्या पेहरावावरूनही ते लक्षात येतच. चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यातच ट्रेलरमध्ये अनेक  गमतीशीर प्रसंग समोर येताना दिसतात. हिटलरच्या भूमिकेतील प्रशांत दामले आणि इतरांच्या तोंडी धमाल संवाद आहेत आणि त्याची झलक या ट्रेलरमध्ये दिसते.

तसेच या चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा चित्रपट म्हणजे एक  लाफ्टर राईड आहे. प्रशांत दामले यात हिटलर करत असल्याने चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे.”असं म्हणत त्यांनी प्रशांत दामलेंच कौतुक केलं आहे.

1 जानेवारी 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित

दरम्यान हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे. “कलाकारांची आणि इतर तंत्रज्ञांची उत्तम साथ मिळाल्याने चित्रपटाची भट्टी चांगलीच जमून आली आहे. आजच्या ट्रेलरनंतर प्रेक्षक चातकासारखी चित्रपटाची वाट पाहतील याची मला खात्री आहे.” असं म्हणत त्यांनी हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाचं गिफ्टच असल्याचं म्हटलं आहे. 1 जानेवारी 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदाने होणार आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार! पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार!
पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास 90 टक्के...
आव्हाडांवर सरकारची पाळत, पोलिसांनी पत्रकार परिषदेत घुसून केले शूटिंग
लक्षवेधी – ‘ब्लिंकिट’ची 10 मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा
मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटीच्या अहवालानंतर, राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
एटीकेटी-कॅरी ऑनचा विषय अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडणार, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा कहर, चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर
अबब! दिवसाला 48 कोटी पगार, हिंदुस्थानी वंशाच्या सीईओची थक्क करणारी कमाई