सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाहीये. विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भेटीवर अंधारे यांची प्रतिक्रिया 

या भेटीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. महाराष्ट्रात सध्या अनेक समस्या आहेत. बीडचं प्रकरण गाजत आहे, परभणीमध्ये देखील आंदोलन सुरू आहे, असे विविध विषय आहेत. फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून न पाहाता संस्था म्हणून पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात सध्या जे प्रश्न आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे फडणवीसांना भेटले असतील तर त्यात चुकीच काय आहे? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी या भेटीवर केला आहे.

विधानसभा निवडणूक निकालात यावेळी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, 231 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तीन पक्ष मिळून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट केवळ 50 जागाच जिंकता आल्या. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वाधिक वीस जागा आहेत, त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद देखील शिवसेना ठाकरे गटालाच मिळण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार! पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार!
पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास 90 टक्के...
आव्हाडांवर सरकारची पाळत, पोलिसांनी पत्रकार परिषदेत घुसून केले शूटिंग
लक्षवेधी – ‘ब्लिंकिट’ची 10 मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा
मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटीच्या अहवालानंतर, राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
एटीकेटी-कॅरी ऑनचा विषय अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडणार, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा कहर, चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर
अबब! दिवसाला 48 कोटी पगार, हिंदुस्थानी वंशाच्या सीईओची थक्क करणारी कमाई