Uddhav Thackeray : डोंगरी कारशेडसाठी 1400 झाडांची कत्तल करणार का? उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल
“विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये सुरु झालेलं आहे. नुकत्याच निवडणुका पार पडल्या. नवीन सरकार महाराष्ट्रात आलं. आधी अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार होतं. आता जो निकाल लागला, तो अनाकलनीय, अनपेक्षित आहे. जनता या सरकारला EVM सरकार म्हणते. या EVM सरकारच हे पहिलं अधिवेशन आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “या सरकारकडून नाईलाजाने जनतेला बऱ्याच आहेत. जो काही निकाल लागला, त्या विरुद्ध आंदोलन सुरु झालेली आहेत. एकूणच या विजयाचा आनंद कुठे दिसला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्याच्या वजाबाकीची चर्चा जास्त रंगली आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजांचे बार जास्त वाजतायत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा परिचय सभागृहाला करुन देतात. ज्यांच्यावर ढीगवर पुरावे घेऊन आरोप केले, गंभीर आरोप केले, ईडी, सीबीआयच्या ज्यांच्यावर धाडी पडल्या, त्यांना सन्मानीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री म्हणून परिचय करुन द्यावा लागतोय, हे कोणतं सरकार, कसं सरकार आहे?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पर्यावरण तज्ञ कसला अभ्यास करणार?
“राज्यपालाचं अभिभाषण झालं, त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. प्रत आज मी वाचली, आमचे आमदार त्यावर सभागृहात बोलतील. राज्यापालांनी माझं सरकार म्हणून भाषण केलं. त्यात पर्यावरणाबद्दल एक पुसटसा उल्लेख आहे, एक समिती नेमणार आहेत, त्यात पर्यावरण तज्ञ असणार आहेत. हे पर्यावरण तज्ञ कसला अभ्यास करणार? या तज्ञांच्या सूचना सरकार ऐकणार आहे का? आरे कारशेडमध्ये झाडांची कत्तल करताना पर्यावरण दिसलं नाही. आता दुसऱ्या डोंगरी कारशेडसाठी 1400 झाडांची कत्तल होणार आहे, ती कत्तल पर्यावरण तज्ज्ञांची समिती होऊ देणार आहे का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेवरुनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List