गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेने बहुमत दिले का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेने बहुमत दिले का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. या सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला. परभणी मध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे पोलिसांनी कस्टडी मध्ये असताना सुर्यवंशी यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.या प्रकरणी पोलिसांवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही.

बीड मध्ये देखील एक गुंड सरपंच संतोष देशमुख यांना धमकी देतो, त्यांचा जीव जाईल इतकी मारहाण होते. सरपंचाचे डोळे जाळले गेले, इतके होईपर्यंत पोलीस गुंड विरोधात कारवाई करत नाही. हा गुंड एका मंत्र्यांच्या विश्वासू आहेत, त्यामुळे त्यांना संरक्षण दिले जाते का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. याप्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता,पण हा प्रस्ताव देखील विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला.

स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक या प्रश्नांवर चर्चा मागत होते पण हा प्रस्ताव फेटाळून विरोधकांचा आवाज दाबला गेला अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. म्हणूनच आज काँग्रेसने सभात्याग केला आणि आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. महायुती सरकारचा निषेध करत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की यासाठी सरकारला बहुमत तुम्हाला मिळाले आहे का?

परभणी आणि बीड प्रकरणी विरोधक घटनास्थळी भेट देणार असल्याचे देखील विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोटरमनला आवश्यक सुविधा पुरवा! रेल कामगार सेनेने घेतली मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांची भेट मोटरमनला आवश्यक सुविधा पुरवा! रेल कामगार सेनेने घेतली मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांची भेट
रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांची भेट घेतली. यावेळी रात्रंदिवस काम करणाऱ्या मोटरमनना आवश्यक...
अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवेय? सूचना पाठवा, पालिकेचे आवाहन
शरद पवार भुजबळांची वाट पाहत दीड तास थांबले
शासकीय बैठकीला राज्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या लेकी’ची उपस्थिती सरकारी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता
रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार; मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टर योजना
मुंबईत पहाटे गारवा, दिवसा लाहीलाही; कमाल तापमानात 6 अंशांची वाढ
रवींद्र नाट्य मंदिरमध्ये लवकरच तिसरी घंटा; फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे निर्देश