कर्नाटकात सायबर चोरांचा 2047 कोटींचा चुना
हिंदुस्थानची आयटी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूत सायबर चोरटय़ांनी अनेकांना गंडा घातला आहे. 11 महिन्यांत कर्नाटकात सायबर गुन्हेगारांनी 20,875 लोकांना आपल्या जाळ्यात फसवून तब्बल 2047 कोटी 20 लाख रुपयांवर डल्ला टाकला. याशिवाय मागील सहा वर्षांत घोटाळेबाजांनी अनेकांची एकूण 3,595 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केली.
डिजिटल अरेस्ट, फिडेक्स स्कॅम अशी काही सायबर चोरांची नवीन शस्त्रे आहेत. फोनद्वारे भीतिदायक माहिती सांगणे, अल्पशिक्षित यांना विविध आमिषे दाखवणे, ओटीपी, पासवर्डची मागणी असा कट रचून फसवणूक केली जाते. या भामटय़ांच्या बोलण्यात निष्पाप लोक अडकतात. कर्नाटकात सायबर दरोडेखोर नागरिकांकडून दर तासाला सात लाख रुपये उकळत असल्याचे उघड झाले आहे. लोकांना पोलिसांकडून कोणतीही गोपनीय माहिती न देण्याचा सल्ला दिला जातो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List