माझ्या स्कर्टमध्ये हात… हृतिक रोशनचे काका, संगीतकार राजेश रोशन यांच्यावर गायिकेचा मोठा आरोप, काय आहे प्रकरण ?

माझ्या स्कर्टमध्ये हात… हृतिक रोशनचे काका, संगीतकार राजेश रोशन यांच्यावर गायिकेचा मोठा आरोप, काय आहे प्रकरण ?

बंगाली गायिका लग्नजीता चक्रवर्तीने एक खळबळजनक विधान केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.तिने बॉलीवूडमधील विख्यात संगीतकार आणि अभिनेता हृतिक रोशन याचे काका राजेश रोशन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे. मात्र तिच्या या आरोपांवर राजेश रोशन यांनी आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.10 डिसेंबर 2024 चा एक व्हिडीओ समोर आला असून एका मुलाखतीमध्ये लग्नजीता चक्रवर्ती हिने तिचे अनुभव सांगतानाच हे आरोप केले आहेत. त्यामुळे आता मोठी खळबळ माजली आहे.

त्या मुलाखतीतील लग्नजीता हिच्या दाव्यानुसार, काही वर्षांपूर्वी मुंबईत ही घटना घडली होती. कामाच्या संदर्भात ती राजेश रोशन यांना भेटण्यासाठी गेली होती, तेव्हाच तिथे हा प्रकार घडल्याचा दावा तिने केला आहे.

काय म्हणाली लग्नजीता ?

या इंटरव्ह्यूमध्ये लग्नजीताने सांगितलं की राजेश रोशन यांनी तिला त्यांच्या सांताक्रूझ येथील घरी येण्याचे निमंत्रण दिले होते, कामासंदर्भात ही भेट होती. ‘ मी जेव्हा मुंबईत रहायचे तेव्हा त्यांनी मला सांताक्रूझला भेटायला बोलावलं. मी त्यांचा घरी गेले, तेथे बसले. तेही थोड्या अंतरावर माझ्या बाजूलाच बसले होते. त्या खोलीत सर्वत्र पियानो आणि संगीताची इतर उपकरणं ठेवली होती’, असं लग्नजीताने सांगितलं.

ते जवळ येत होते

लग्नीजाताच्या सांगण्यानुसार, राजेश रोश यांनी तिला माहिती विचारत तिच्या कामाचे काही नमून दाखवण्यास सांगितलं. तिच्या हातात आयपॅड दिला आणि यूट्यूबवर तिची गाणी शोधण्यास सांगितलं. ‘ माझ्या हातात आयपॅड होता, मी टाईप करत माझी गाणी शोधत होते. तेवढ्यात मला जाणवलं की ते ( राजेश रोशन) माझ्याजवळ येत होते .’

माझ्या स्कर्टमध्ये हात घातला

लग्नजीता म्हणाली ‘ मी पहिल्यांदाच स्कर्ट घातला होता. मी आयपॅडवर टायपिंग करत होते, तेव्हा मला जाणवलं की ते हळू-हळू माझ्याजवळ येत होते. मी विचार केला, बघूया तर ते काय करतात, किती पुढे येतात ते पाहू. पण थोडाही वेळ न लावता ते पुढे आले, कॅमेऱ्यावर सांगतनाही विचित्र वाटतं पण त्यांचा हात माझ्या स्कर्टच्या आतमध्ये होता. मी लगेच तिथून उठले आणि निघून जाण्याचा निर्णय घेतला ‘ असं तिने स्पष्ट केलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sreemoyee Piu (@straightupwithshree)

 

माझ्यावर परिणाम झाला नाही

कास्टिंग काऊच हे काही फक्त बॉलिवूडपुरतंच मर्यादित नाहीये, संगीत क्षेत्रातही ते असतंच असं लग्नजीता म्हणाली. ‘मी या गोष्टीचा स्वत:वर जास्त परिणाम होऊ दिला नाही की त्या गोष्टीचा खूप गवगवाही केला नाही.कारण मला वाटत ही त्यांची चूक होती, ते असं वागले हे त्यांचं चुकीचं वागणं होतं. त्याचं दायित्व त्यांच आहे, माझं नाही ‘ असं तिने नमूद केलं. लग्नजीता चक्रवर्ती एक प्रसिद्ध बंगाली गायिका आहे. तिने अनेक जाहिरातीसांठी, जिंगल्ससाठी आवाज दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Prajakta Mali : सुरेश धस यांच्यासोबत वाद पेटणार? प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना भेटणार, काय आहे अपडेट Prajakta Mali : सुरेश धस यांच्यासोबत वाद पेटणार? प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना भेटणार, काय आहे अपडेट
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 19 दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. त्याविरोधात बीड जिल्ह्यातील...
आले तुफान किती, जिद्द ना सोडली..; सूरज चव्हाण स्वत:च बांधतोय ‘बिग बॉस’चा बंगला
गोविंदाच्या मुलीचं मासिक पाळीबद्दल वादग्रस्त वक्तव्य; नेटकरी म्हणाले ‘हिला समजवा..’
नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई पटोले यांचे निधन
अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाचा फटका, उरणमधील रब्बी पिके डेंजर झोनमध्ये
राज्य सरकारच्या तिजोरीला महापालिकेचा टेकू ! तीन करांतून पाच वर्षांत दिले 559 कोटी
शेअर ट्रेडिंगच्या परताव्याचे मायाजाळ