लोकसभा निवडणुकीच्या निकालाने संविधानाचं रक्षण केलं; प्रियंका गांधी यांचं विधान
लोकसभेत संविधानावर चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील आपल्या भावना मांडल्या. शुक्रवारी संसदेत बोलताना त्यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारला लक्ष्य केलं. लोकसभा निवडणुकीचे निकाल आता आले आहेत तसे नसते आणि भाजपला चांगल्या जागा मिळाल्या असत्या तर सरकारनं संविधान बदलण्याचं काम सुरू केलं असतं.
चर्चेत भाग घेताना त्यांना मोदी सरकारवर घणाघाती आरोप केला. त्या म्हणाल्या की, ‘संविधान हे न्याय, एकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षक कवच आहे, परंतु गेल्या 10 वर्षांत सरकारने ती मोडीत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले’.
‘हे सरकार लॅटरल एंट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षणाचं धोरण कमकुवत करण्याचं काम करत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, तर सरकारने संविधान बदलण्याचं काम सुरू केले असतं’, असं त्यांनी ठासून सांगितलं.
‘सत्य हे आहे की ते आता’संविधानाचा’ वारंवार जप करत आहेत कारण त्यांना हे समजलं आहे की या देशातील लोक संविधान जिवंत ठेवतील’, असंही त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, देशातील जनता ही जातीवर आधारित जनगणनेची मागणी करत आहेत.
निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळची आठवण करून त्या म्हणाल्या, ‘जेव्हा विरोधकांनी जातीवर आधारित जनगणनेची मागणी केली, तेव्हा यालोकांनी’ गुरेढोरे आणि ‘मंगळसूत्र’ असे विषय यांनी पुढे केले’, असा आरोप असं प्रियंका म्हणाल्या.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला होता. भाजप स्वबळावर अवघ्या 240 संख्येपर्यंत पोहोचू शकली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List