Stock Market Crash – शेअर बाजार कोसळला, एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी बुडाले
शेअर बाजार सुरू होताच आज दणक्यात कोसळला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. सेन्सेक्स 1100 अंशांनी कोसळून 80230 वर आला. तर निफ्टीतही 300 अंशांनी घसरला. बँकिंग, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रांमधील शेअरची जोरदार विक्री झाल्याने बाजार कोसळला. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी रुपये बुडाले.
मिडकॅक आणि स्मॉलकॅपमध्येही सन्नाटा आहे. दोन्ही सेक्टरमधील इंडेक्स मोठ्या प्रमाणात घसरले आहे. सेन्सक्समधील 30 शेअर पैकी फक्त भारतीय एअरटेलचा शेअर तेजीत आहे. उर्वरित 29 शेअर आपटले आहेत. टाटा स्टील आणि एसबीआयचे शेअर सर्वाधिक कोसळले आहेत. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. दुसरीकडे भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि अदानी पोर्ट्सचे शेअर तेजीत दिसून आले.
शेअर बाजारात झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे 6.82 लाख कोटी रुपये बुडाले. शेअर बाजारातील या घसरणीमागे नफेखोरी असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात विक्री केली. याशिवाय जागतिक संकेतही चांगले नाहीत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरावरील अंदाजावरून बाजारात घसरण झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरून 73.38 डॉलर प्रति बॅरलवर आल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List