दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, एका आठवड्यात दुसरी घटना
दिल्लीतील काही शाळांना शुक्रवारी धमकीचा ईमेल आहे. ईमेलमधून शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
दिल्ली पब्लिक स्कूल, सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूल या शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. यामुळे विद्यार्थ्यांना घरी परत पाठवण्यात आलं आहे. शाळांनीही पालकांना मेसेज पाठवून मुलांना आज शाळेत न पाठवण्यास सांगितलं आहे.
एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार ईमेल मध्ये म्हटले आहे की, ‘शाळेच्या परिसरात अनेक स्फोटकं आहेत. खात्री आहे की विद्यार्थी शाळेत प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या दप्तरांची वारंवार तपासणी करत नाही. मात्र हे बॉम्ब इमारती उद्ध्वस्त करू शकतात आणि लोकांचे बळी देखील जाऊ शकतात. 13 आणि 14 डिसेंबर हे दोन्ही दिवस तुमच्या शाळेचे दिवस असू शकतात. 14 डिसेंबर रोजी काही शाळांमध्ये पालक-शिक्षकांची बैठक आहे, बॉम्बचा स्फोट घडवून आणण्याची ही एक चांगली संधी आहे’.
इतकंच नाही तर धमकी देणाऱ्यांच्या ‘मागण्या’ जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना ईमेलला उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
श्वानपथकासह अग्निशमन विभाग, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके शाळांमध्ये पोहोचली आहेत आणि तपासणी करत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिल्ली पोलिस आयपी ॲड्रेसचाही तपास करत आहेत आणि ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, 9 डिसेंबर रोजी, दिल्लीतील 40 हून अधिक शाळांना ईमेलद्वारे अशीच बॉम्बची धमकी मिळाली. तपासानंतर पोलिसांनी अफवा असल्याचं सिद्ध झालं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List