राहुल गांधींनी संभल हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संभल हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दिल्लीत त्यांनी संभल हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबातील चार सदस्यांची भेट घेतली, या भेटीत संभल हिंसाचारावर सविस्तर चर्चा झाली. याआधी त्यांनी स्वतः संभल येथे जाण्याचा पर्यंत केला होता. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं नाही. यानंतर आता त्यांनी दिल्लीत काही पीडित कुटुंबातील काही सदस्यांची भेट घेतली आहे.
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी बिलाल, रुमन, अयान आणि कैफ यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या हिंसाचारात या चार तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या भेटीदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधीही तिथे उपस्थित होत्या. त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली. त्याच्यात काय चर्चा झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, राहुल गांधी यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला संभलला जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियांका गांधीही होत्या. मात्र पोलिसांनी त्याला गाझीपूर सीमेवर अडवल्यावर राहुल गांधी यांनी एकट्याने जाण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना तशी परवानगीही दिली नाही, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List