पतीच्या संमतीशिवाय माहेरच्यांना घरात ठेवणे ही ‘क्रूरताच’, कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा

पतीच्या संमतीशिवाय माहेरच्यांना घरात ठेवणे ही ‘क्रूरताच’, कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा

पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्रमंडळींना घरात ठेवणे ही पत्नीने पतीच्या बाबतीत केलेली क्रूरता आहे, असा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. पत्नी माहेरच्या लोकांना आपल्या घरात वारंवार मुक्कामी ठेवत असल्याने आपला मानसिक छळ होत आहे, असा दावा करीत पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा दावा ग्राह्य धरला आणि क्रूरतेच्या आधारे पत्नीपासून घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली.

पत्नीच्या माहेरचे लोक घरात तळ ठोकून राहतात. त्यामुळे त्रस्त झालेल्या पतीने आधी कनिष्ठ न्यायालयात घटस्फोटासाठी दाद मागितली होती. मात्र कनिष्ठ न्यायालयाने क्रूरता घडल्याचा दावा अमान्य करीत घटस्फोटाचा अर्ज फेटाळला होता. तो निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंडपीठाने रद्द केला. याचिकाकर्ता पतीच्या शासकीय निवासस्थानी पत्नीच्या माहेरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दीर्घकाळ येऊन राहायचे. त्यांच्या मुक्कामावर पतीने आक्षेप घेतला होता. त्यानंतरही पत्नीने माहेरचे लोक आणि मित्रमंडळींचा मुक्काम रोखला नव्हता. हा सर्व प्रकार पतीच्या बाबतीत क्रूरताच आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना नोंदवले.

नेमके प्रकरण काय?

घटस्फोट मिळालेल्या दाम्पत्याचे 2008 मध्ये नबद्वीप येथे लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे कोलाघाट येथे राहण्यास गेले. काही दिवसांनी पत्नीचे कार्यालय नरकेलडांगा येथे शिफ्ट झाले आणि ती तिथे राहण्यास गेली. मात्र तिच्या माहेरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी पतीच्याच शासकीय निवासस्थानी मुक्कामाला यायचे. पतीला ही बाब खटकली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन अन् चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन अन् चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत
संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील दुर्घटनेमुळे अभिनेता अल्लू अर्जुन सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्याच्यावरील आरोप आणि संकटे वाढतच चालले पाहायला मिळत आहे....
हिवाळ्यात रिकाम्या पोटी किती पाणी पिणे आवश्यक? जाणून घ्या तज्ञांकडून पाणी पिण्याची योग्य पद्धत
घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा मार्केटपेक्षा चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सॉस…रेसीपी नक्की वाचा
विठ्ठल मंदिराचा दरवाजा चांदीने झळाळणार, भक्ताकडून 30 किलो चांदी दान
पुण्यातील मुळा मुठा नदीत मृत माशांचा खच, चौकशी सुरू
“तळघर, आकर्षक विद्युत रोषणाई अन्…”, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, आतापर्यंत किती कोटींचा खर्च?
VIDEO : “कल खेल में, हम हों न हों…” प्रकृतीत सुधारणा होताच विनोद कांबळी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर