Champions Trophy 2025 Schedule – हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेटयुद्धाला 23 फेब्रुवारीचा मुहूर्त

Champions Trophy 2025 Schedule – हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेटयुद्धाला 23 फेब्रुवारीचा मुहूर्त

अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर हायब्रीड मॉडेलचा मुलामा चढताच हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित, बहुचर्चित लढतीला शुक्रवारचा मुहूर्त लाभला आहे. पाकिस्तानसह दुबईत रंगणाऱया या स्पर्धेतील हिंदुस्थानच्या लढती दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जातील. एकूण 18 सामने या स्पर्धेत खेळविले जाणार असून हिंदुस्थानचे तिन्ही साखळी सामने दुबईत खेळविले जातील. तसेच एक उपांत्य सामना दुबईतच होणार असून अंतिम सामनाही इथेच खेळविला जाणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. मात्र हिंदुस्थानचा संघ साखळीतच बाद झाला तर अंतिम सामना लाहोरला खेळविला जाईल आणि बाद फेरी गाठली तर  हा सामना दुबईला स्थलांतरित केला जाणार असल्याची दिली. या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्याला राखीव दिवस ठेवण्यात आल्याची माहिती आयसीसीने दिली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी कार्यक्रम 

अ गट – हिंदुस्थान, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश

ब गट – द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

दिनांक        सामना                         ठिकाण

19 फेब्रु.      पाकिस्तान – न्यूझीलंड         कराची

20 फेब्रु.     बांगलादेशहिंदुस्थान         दुबई 

21 फेब्रु.      अफगाणिस्तान – द. आफ्रिका     कराची

22 फेब्रु.    ऑस्ट्रेलिया – इंग्लंड                   लाहोर

23 फेब्रु.        हिंदुस्थानपाकिस्तान         दुबई 

24 फेब्रु.     बांगलादेश – न्यूझीलंड     रावळपिंडी

25 फेब्रु.       ऑस्ट्रेलिया – द. आफ्रिका रावळपिंडी

26 फेब्रु. अफगाणिस्तान – इंग्लंड    लाहोर

27 फेब्रु. पाकिस्तान – बांगलादेश   रावळपिंडी

28 फेब्रु.   अफगाणिस्तान – ऑस्ट्रेलिया    लाहोर

1 मार्च द. आफ्रिका- इंग्लंड      कराची

2 मार्च    न्यूझीलंडहिंदुस्थान दुबई 

4 मार्च पहिला उपांत्य सामना  दुबई

5 मार्च दुसरा उपांत्य सामना लाहोर

9 मार्च अंतिम सामना लाहोर

(हिंदुस्थान पात्र ठरल्यास सामना दुबईमध्ये

10 मार्च   राखीव दिन लाहोर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“तळघर, आकर्षक विद्युत रोषणाई अन्…”, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, आतापर्यंत किती कोटींचा खर्च? “तळघर, आकर्षक विद्युत रोषणाई अन्…”, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, आतापर्यंत किती कोटींचा खर्च?
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्पातील टप्पा १ च्या कामासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स...
VIDEO : “कल खेल में, हम हों न हों…” प्रकृतीत सुधारणा होताच विनोद कांबळी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
सोनाक्षी सिन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी अवघ्या 3000रुपयांवर नोकरी करायची; शिक्षण जाणूनही वाटेल आश्चर्य
रात्रभर दारू पितो, स्मोक करतो,स्वत:वर कंट्रोल नाही; आमिर खानच्या सवयी ऐकून नाना पाटेकरांचा सल्ला
कॅन्सरशी मुकाबला : डॉ. अंकिता पटेल यांच्यासोबत प्रदीर्घ संवाद – TV9 डिजिटलवर
पावसाप्रमाणे थंडीचाही लहरीपणा सुरू; विदर्भावर ढग दाटले, अवकाळीची शक्यता
महायुतीच्या 15 दिवसाचा सात बारा, रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी