मुंबईत व्हेज पिझ्झाला सर्वाधिक पसंती, ‘स्विगी’ची सेवा जोरात

मुंबईत व्हेज पिझ्झाला सर्वाधिक पसंती, ‘स्विगी’ची सेवा जोरात

हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला खाद्यपदार्थांच्या वैविध्यपूर्णतेसाठीही ओळखले जाते. 2024 या वर्षात घरबसल्या चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकरांनी ‘स्विगी’वर विश्वास दाखवला. एका व्यक्तीने तर एकाच दिवशी 19,960 रुपयांचे 75 व्हेज पिझ्झा मागवले. यंदाच्या वर्षात तब्बल 1.4 दशलक्ष व्हेज पिझ्झा ऑर्डर्ससह मुंबई देशाची पिझ्झा राजधानी ठरली. चिकन रोल, पोटॅटो फ्राइज आणि व्हेज सँडविच यांसारख्या पदार्थांची मुंबईकरांनी चव चाखली.

दरम्यान, मुंबईचे यंदाच्या वर्षातील सर्वांत मोठे बिल 45,724 रुपये ठरले. नाश्त्यासाठी ग्राहकांनी दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना पसंती दिली. यामध्ये मेंदूवडा, इडली, डोसा यांचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक केक्सही याच शहरात मागवण्यात आले. दिवाळी आणि दुर्गापूजा या सणांवेळी मोठय़ा प्रमाणात गोड पदार्थांची ऑर्डर देण्यात आली.

‘2024 या वर्षात देशातील नागरिकांनी स्विगीमार्फत विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. मुंबईकरांनी स्विगीवर सर्वाधिक विश्वास दाखवला. आमच्या ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवल्याचा खूप आनंद होतो. पुढेदेखील आम्ही अशीच सेवा देत राहू’, असे स्विगी फूड मार्केटप्लेसचे मुख्य व्यवसाय अधिकारी सिद्धार्थ भकू यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“तळघर, आकर्षक विद्युत रोषणाई अन्…”, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, आतापर्यंत किती कोटींचा खर्च? “तळघर, आकर्षक विद्युत रोषणाई अन्…”, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, आतापर्यंत किती कोटींचा खर्च?
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्पातील टप्पा १ च्या कामासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स...
VIDEO : “कल खेल में, हम हों न हों…” प्रकृतीत सुधारणा होताच विनोद कांबळी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
सोनाक्षी सिन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी अवघ्या 3000रुपयांवर नोकरी करायची; शिक्षण जाणूनही वाटेल आश्चर्य
रात्रभर दारू पितो, स्मोक करतो,स्वत:वर कंट्रोल नाही; आमिर खानच्या सवयी ऐकून नाना पाटेकरांचा सल्ला
कॅन्सरशी मुकाबला : डॉ. अंकिता पटेल यांच्यासोबत प्रदीर्घ संवाद – TV9 डिजिटलवर
पावसाप्रमाणे थंडीचाही लहरीपणा सुरू; विदर्भावर ढग दाटले, अवकाळीची शक्यता
महायुतीच्या 15 दिवसाचा सात बारा, रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी