काहीही होऊ शकतं…; छगन भुजबळ यांच्या नाराजीवर अंबादास दानवे यांचं मोठं विधान
मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील तिन्ही पक्षांमधील बड्या नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तर आपली नाराजी जाहीर केली आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठे भाकित केले आहे. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला घेरले आहे.
काहीही होऊ शकतं. ज्या पद्धतीने भुजबळ व्यक्त होत आहेत ते पाहता अजित पवार यांच्यासोबत ते राहतील असे वाटत नाही. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होत नाही. पण भुजबळ आणि फडणवीस यांची भेट होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जे बोलल्या आहेत, ते बरोबर आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.
बीड प्रकरणातील आरोपी सरकाला सापडत नाही. सरकार गंभीर पावलं उचलत नाही. संतोष देशमुख यांना हालहाल करून त्यांची हत्या करण्यात आली. आरोपी आणि पोलीस यांचे व्हिडीओ समोर आले होते. बीड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List