नवी दिल्लीत धक्कादायक घटना! संसदेबाहेर एका व्यक्तीने स्वतःलाच पेटवले
देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कदायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने संसदेबाहेर स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर त्याने संसदेच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी तातडीने पावले उटलत त्याला अडवले. त्यावेळी तो गंभीर होरपळलेल्या अवस्थेत होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे राजधानीत खळबळ उडाली आहे. स्वतःला पेटवून घेतलेवा व्यकती कोण होता? त्याने असं का केलं? याचा तपास पोलीस करत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही दाखल झाले आहे. पोलिसांना घटनास्थळी पेट्रोल सापडले आहे. तसेच एक जळालेल्या स्थितीतील चिठ्ठीही सापडली आहे. आता पोलिसांच्या तपासानंतर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालानंतर या घटनेमागील अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List