सनी देओलने ‘जाट’ सिनेमातून केले दमदार पुनरागमन! टीझर प्रदर्शित
अभिनेता सनी देओलच्या आगामी अॅक्शन सिनेमा “जाट”चा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अॅक्शन सुपरस्टार परत आला आहे, असंच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी ब्लॉकबस्टर ‘पुष्पा 2’च्या विशेष प्रीमियर दरम्यान ‘जाट’चा टीझर प्रदर्शित झाला. 12,500 स्क्रीनवर हा टीझर दाखवण्यात आला.
या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा या प्रेक्षकांची एनर्जी अफलातून होती. सनी देओलच्या दमदार अभिनयाने आणि थरारक अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांनी जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद दाखवला. या चित्रपटात रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कैसंड्रा या सारखे अभिनेता पाहायला मिळणार आहे.
‘जाट’ या सिनेमाची संगीताची जबाबदारी थमन एस यांनी घेतली आहे, तर सिनेमॅटोग्राफी ऋषी पंजाबी यांनी सांभाळली आहे. नवीन नूली यांनी एडिटींगचे काम अतिशय चोख केले असून, अविनाश कोला यांनी प्रोडक्शन डिझाइनची जबाबदारी पार पाडली आहे. अॅक्शन सीनसाठी अनल अरासु, राम-लक्ष्मण आणि वेंकट यांच्या टीमने स्टंट आणि रोमांचक अॅक्शन सिक्वेन्स तयार केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List