हरलीनच्या शतकाने हिंदुस्थानचा मालिका विजय; वेस्ट इंडीजवर केली 115 धावांनी मात

हरलीनच्या शतकाने हिंदुस्थानचा मालिका विजय; वेस्ट इंडीजवर केली 115 धावांनी मात

वडोदरा, दि. 24 (वृत्तसंस्था) – हरलीन देओलच्या पहिल्यावहिल्या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानी महिला संघाने वेस्ट इंडीजच्या महिलांचा 115 धावांनी पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता तिसरा आणि अंतिम सामना 27 डिसेंबरला खेळला जाईल.

धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात पहिल्या डावात हरलीनने 115 धावांची शतकी खेळी करत हिंदुस्थानला 358 धावांचा डोंगर उभारून दिला. विंडीजच्या महिलांना हे 359 धावांचे आव्हान पेलवलेच नाही. विंडीजची कर्णधार आणि सलामीवीर हेली मॅथ्यूजने 109 चेंडूंत 106 धावांची आक्रमक खेळी करताना संघाच्या विजयासाठी एकाकी झुंज दिली. तिच्या शतकामुळे वेस्ट इंडीजचा डाव 243 पर्यंत पोहचू शकला. तिने शेमेन कॅम्पबेलसह पाचव्या विकेटसाठी केलेल्या 112 धावांची भागी केली.

कॅम्पबेलने 38 धावांची चिवट खेळी केल्यामुळेच विंडीजला दोनशेचा टप्पा गाठता आला. हिंदुस्थानच्या दीप्ती शर्मा आणि टिटास साधू या दोघींनी प्रत्येकी दोन-दोन विकेट टिपल्या तर प्रिया मिश्राने 49 धावांत 3 विकेट मिळवल्या.

19 वर्षांखालील हिंदुस्थानचा संघ जाहीर; महिला वर्ल्डकपची धुरा निकी प्रसादच्या हाती

त्याआधी गेले दोन आठवडे सुपर फॉर्मात असलेल्या स्मृती मानधनाने आजही आपला अर्धशतकी झंझावात कायम राखत सलग सहावे अर्धशतक साजरे केले. तिने गेल्या सहा डावांत 53, 91, 77, 62, 54 आणि 105 अशा खेळय़ा करत आपला जबरदस्त खेळ पेश केला.  तिने प्रतिका रावलसह 110 धावांची सलामी दिली.

त्यानंतर रावल (76) आणि हरलीन देओलने 62 धावांची भर घातली. मग हरलीनन हरमनप्रीत कौरबरोबर 43 तर जेमिमा रॉड्रिग्जबरोबर (52) चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागी रचल्यामुळे हिंदुस्थानी संघ 358 धावांपर्यंत मजल मारू शकला. आजच्या प्रचंड धावसंख्येच्या सामन्यात हिंदुस्थानी महिलांनी 43 चौकार आणि 4 षटकार खेचले, तर विंडीजच्या फलंदाजांनीही 32 चौकारांचा हल्ला चढवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट
जॅकलिन फर्नांडिसला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी लिहिले आहे, “माझ्यासाठी तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस. तुझे...
गुणरत्न सदावर्ते लवकरच झळकणार चित्रपटात, निर्माते-दिग्दर्शकांसोबत बोलणं सुरु, तारीखही निश्चित?
अनेक समस्यांवर औषधी गुळवेल ‘या’ लोकांसाठी ठरते घातक… एकदा नक्की वाचा
Video – बीड, परभणी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक; सरकारला फटकारले
दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा
Video – दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा; ईडी, सीबीआयला वरून आदेश आला! अरविंद केजरीवाल याचा खळबळजनक आरोप
मिंधेंच्या खासदाराचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा; पोलिसांची हप्ते वसुली, सामान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप