पुरात बुडालेल्या जिल्हा परिषद सदस्याचा मृतदेह चार महिन्यांनी सापडला

पुरात बुडालेल्या जिल्हा परिषद सदस्याचा मृतदेह चार महिन्यांनी सापडला

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात ट्रॅक्टर-ट्रॉली पाण्यात पलटी होऊन झालेल्या अपघातात बुडालेले अकिवाट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बाबासो बैरागदार (वय 56) यांचा मृतदेह चार महिन्यांनंतर कर्नाटकातील इंगळी (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे कृष्णा नदीच्या पात्रात सापडला. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल, सुपारीच्या डब्याने आणि कपड्यांवरील खुणांवरून कुटुंबीयांनी त्यांची ओळख पटवली.

2 ऑगस्ट 2024 बैरागदार आणि त्यांचे सहकारी ट्रॅक्टरने बस्तवाड शेताकडे जात असताना, पुलावरून ट्रॅक्टर नदीत कोसळला होता. अपघातात चारजण बचावले, तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अण्णासाहेब हसुरे आणि इक्बाल बैरागदार वाहून गेले होते. हसुरे यांचा मृतदेह घटनेनंतर तीन दिवसांत सापडला. मात्र, बैरागदार यांचा शोध लागला नव्हता.

शासनाने शोधमोहीम थांबवल्यानंतर बैरागदार यांचे नातेवाईक खचले नाहीत. त्यांनी चार महिन्यांपासून कृष्णा नदीकाठावर पत्रके वाटणे, प्रसिद्धिमाध्यमांतून माहिती देणे आणि चौकशी करणे, असे प्रयत्न सुरू ठेवले. दरम्यान, मंगळवारी कर्नाटकातील देसाई इंगळी गावच्या नदीकाठच्या शेतात ऊसतोड सुरू असताना त्यांचे मानवी अवशेष आढळून आले. अवशेषाजवळ सापडलेले मोबाईल आणि कपडे यावरून बैरागदार यांची ओळख पटली.

बैरागदार कुटुंबाची आतुरता अखेर संपली

इंगळी येथे मृतदेह सापडल्याचे समजताच, नातेवाईकांनी ओळख पटवली. बैरागदार यांच्या मृतदेहावर अकिवाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मृतदेह मिळाल्याने धार्मिक विधी पूर्ण करण्याचे समाधान मिळाले असले, तरी या घटनेने कुटुंबीय व मित्रपरिवार दुःखमग्न झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी फरार
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार