फक्त क्लास नाही, तर शाळेतूनही पळून जायचो! अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट
सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘कौन बनेगा करोडपती’च्या 16व्या पर्वात बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी स्वतःसंबंधी एक मोठा गौप्यस्फोट केला.
या सीझनचा एक प्रोमो समोर आला असून, या शोमध्ये एक स्पर्धक अमिताभ बच्चन यांना विचारतो की, ‘तुम्ही ‘मोहब्बतें’ या चित्रपटात कठोर शिस्तीच्या प्रिन्सिपलची भूमिका साकारली होती. तुम्ही खरंच इतके कठोर प्रिन्सिपल असते का? तुम्ही कधी शाळेला दांडी मारलीय का?’ असे सवाल केले.
यावर अमिताभ यांनी उत्तर दिले की, ‘तुम्हाला वाटतेय का, मी प्रिन्सिबल बनू शकतो? शिक्षणात मी अगदीच ‘ढ’ होतो. त्यामुळे आयुष्यात कधीच प्रिन्सिपल बनू शकलो नसतो. परंतु माझ्या शाळेतील मुख्याध्यापक मात्र कडक शिस्तीचे होते. मी केवळ क्लास नव्हे, तर शाळेतूनही पळून जायचो,’ असे सांगून, ‘मी त्यावेळी नैनिताल येथील एका बोर्डिंग शाळेत शिकत होतो. आम्ही कॅम्पसच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो; परंतु रात्री सर्व झोपल्यानंतर मी गुपचूप बाहेर पडायचो. पकडले गेलो तर मला शिक्षा मिळायची,’ असा अनुभव बिग बींनी कथन केला.
या आठवड्यात मजेदार ट्विस्ट
‘कौन बनेगा करोडपती’च्या कार्यक्रमात एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यावेळी पुन्हा एकदा ‘इंडिया चॅलेंजर वीक’ सोबत एक मजेदार ट्विस्ट येणार आहे. या आठवड्यात 10 प्ले अलाँग स्पर्धांपैकी फास्टेट फिंगर सर्च राऊंडच्या टॉप-2 स्पर्धकांना हॉट सीटवर जागा मिळणार आहे. लवकरच पाच बजर राऊंडमध्ये स्पर्धा करतील. यावेळी चॅलेंजचा विजेता मनी ट्रिवर सहाव्या प्रश्नापासून सुरुवात करीत खेळ चालू ठेवेल. ‘इंडिया चॅलेंजर वीक’च्या या रोमहर्षक लाइनअपमध्ये पंजाबचा जसपाल सिंह सहभागी झालेला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List