हिवाळ्यात बाईक किंवा स्कूटर सुरू करण्यात येतेय अडचण? मग ‘हे’ काम नक्की करा
हिवाळा सुरु झाला आहे. यातच जर तुम्ही तुमची बाईक किंवा स्कूटर एक आठवड्यापेक्षा जास्त काळ वापरली नाही, तर तुम्हाला वाहन सुरु करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. आता यामागे नेमकी काय करणे आहेत, अशा अडचणी येऊ नये म्हणून काय करावं? याचबद्दल आपण सावितर माहिती जाणून घेणार आहोत…
ग्रीस वापरू नका
अनेकदा असं होतं की, स्थानिक ठिकाणी वाहनाची सर्व्हिसिंग केल्यानंतर मेकॅनिक बॅटरीच्या टर्मिनलवर ग्रीस लावता., परंतु असे केल्याने बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होतो. टर्मिनल्सवर ग्रीस लावल्याने बॅटरी खराब होऊ शकते. म्हणून ग्रीसऐवजी तुम्ही पेट्रोलियम जेली किंवा व्हॅसलीन वापरू शकता.
बॅटरी टर्मिनलकडे लक्ष द्या
महिन्यातून दोनदा बॅटरी आणि टर्मिनल्स तपासले पाहिजेत. बऱ्याच वेळा ॲसिड बॅटरी टर्मिनल्सजवळ जमा होते, जे वेळेवर साफ करणे खूप महत्वाचे आहे. जर बॅटरी मेंटेनन्स फ्री नसेल आणि त्यात बॅटरीचे पाणी वापरले जाते.
याकडेही लक्ष द्या
रात्रीच्या वेळी बाईक चालवताना हेडलाइट्स कमी-जास्त होत असतील आणि हॉर्नच्या आवाजात कमकुवतपणा येत असेल, तर हे बॅटरीची समस्या आहे, हे समजून घ्या. अशातच ताबडतोब एखाद्या मेकॅनिकशी संपर्क साधा आणि आवश्यक असल्यास, बॅटरी त्वरित बदलून घ्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List