उद्धव ठाकरे किंवा ममतांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे, सत्यपाल मलिक यांचे मत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे, असे मत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज व्यक्त केले. संधी मिळाल्यास इंडिया आघाडीचे नेतृत्व करायला मी तयार आहे, असे विधान ममतांनी केले होते. यावर आज मलिक यांनी भाष्य केले. इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी सर्वात लोकप्रिय, प्रभावशाली आणि सक्षम आहेत. या दोघांपैकी एकाकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व दिल्यास इंडिया आघाडी देशात यशस्वी होईल, असे मलिक यांनी नमूद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List