‘शिवा’ला आशुतोष देणार घटस्फोट? मालिकेच्या कथानकात आश्चर्यकारक वळण
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिवा आणि आशू गुळूंब गावावरून घरी आलेत. आशू गायब झाल्याच्या धक्क्याने सीताई अंथरुणाला खिळलेली होती. आशू सुरक्षित असल्याचं पाहून ती सुटकेचा नि:श्वास सोडते
सातार्यात नेमकं काय घडलं याची विचारणा सीताई आशूला करते. आशू खोटं सांगून सत्य लपवतो, पण सीताई शिवाला सातार्यात काय घडलं ते सांगायला भाग पडते. शिवा आशूच्या अपहरणाचा सगळा प्रकार सांगते. हे ऐकून सीताई संतापते आणि सगळ्या घडलेल्या प्रकारासाठी शिवालाच जबाबदार ठरवते.
इकडे किर्ती वस्तीत जाऊन हा मुद्दा उचलते आणि बाईआजी, वंदनाला आशूसोबत जे घडलं त्यासाठी माफी मागायला लावते. शिवा तिथे पोहोचताच कीर्ती हे सगळं सीताईनेच करायला सांगितल्याचं सांगते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List