गूगल मॅपने पुन्हा धोका दिला, गोव्याऐवजी कर्नाटकाच्या जंगलात पोहचवले कुटुंबाला
गूगल मॅपच्या चुकीच्या निर्देशकामुळे अपघाताच्या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. गूगल मॅपच्या मदतीने गोव्याला चाललेले बिहारचे कुटुंब थेट कर्नाटकाच्या घनदाट जंगलात पोहचले. या कुटुंबाला संपूर्ण रात्र जंगलात काढावी लागली.
उज्जैन येथील एकाच कुटुंबातील दोन पुरूष आणि दोन महिला कारने गोव्याला चालले होते. गोव्याचा मार्ग कळण्यासाठी त्यांनी गूगल मॅपची मदत घेतली. मात्र गूगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कुटुंब थेट कर्नाटकमध्ये शिरोलीच्या घनदाट जंगलात पोहचले.
जंगलात दूरवर गेल्यानंतर आपण रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाटेत कुठलीही वस्ती नाही, मोबाईलला नेटवर्क नाही. रस्ता माहित नसल्याने कुटुंबाला पुढेही जाता येत नव्हते. त्यामुळे अन्न-पाण्याशिवाय त्यांना रात्रभर घनदाट जंगलात बसावे लागले.
घाबरलेल्या कुटुंबाने नेटवर्क शोधण्यासाठी पहाटे चार किलोमीटर चालत इमर्जन्सी क्रमांक 112 वर कॉल करून मदत मागितली. कुटुंबाच्या फोननंतर खानापूर पोलिसांनी तात्काळ जंगलाच्या दिशेने धाव घेत 31 किमी प्रवास करून अडकलेल्या कुटुंबाची सुटका केली. त्यानंतर त्यांच्यासाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करत त्यांना गोव्याच्या दिशेने मार्गस्थ केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List