सायरा बानो यांची प्रकृती चिंताजनक, चालताही येईना, घरीच उपचार सुरु
Saira Banu Health Update: दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अभिनेत्री सायरा बानो पतीच्या आठवणी आयुष्य जगत आहेत. सायरा बानो कायम सोशल मीडियावर देखील पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त करत असतात. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यांची प्रकृतीही ढासळू लागली आहे. आता त्यांना न्यूमोनिया झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे.
सायरा बानो यांचं फक्त त्यांच्या सौंदर्यामुळेच नाही तर, अभिनयामुळे देखील सर्वच स्तरातून कौतुक झालं. शिवाय स्टाईल आयकॉन म्हणून देखील त्यांची ओळख होती. पण 1970 साली खासगी आयुष्याचं कारण सांगत त्यांनी बॉलिवूडचा निरोप घेतला. पण त्यांनी कायम चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
सदाबहार अभिनेत्री सायरा बानो यांची प्रकृती ढासळत चालली आहे. वर्षाच्या सुरुवातील कळलं होतं की, सायरा बानो यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, आता सायरा बानो यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.
सांगायचं झालं तर, सायरा बानो यांचे पती दिलीप कुमार यांचं 2021 मध्ये निधन झालं. वर्षाच्या सुरुवातीला सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना त्यांच्या 58 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट केली होती. सायरा बानो यांनी लग्नाच्या आठवणी ताज्या केल्या होत्या…
सायरा बानो यांनी सांगितलं होतं की, लग्न इतक्या गोंधळात झालं होतं की, स्थानिक टेलरच्या मदतीने शेवटच्या क्षणी लेहेंगाची व्यवस्था करण्यात आली होती. सायरा बानो यांनी सोशल मीडियावर लग्नाचे अनेक फोटो देखील पोस्ट केले.
सायरा बानो यांचे सिनेमे
आज सायरा बानो यांना कोणत्या ओळखीची गरज नाही. सायरा बानो यांनी वयाच्या 17 व्या वर्षी 1961 साली प्रदर्शित झालेल्या ‘जंगली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात त्यांनी अभिनेते शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. अभिनेत्रीच्या चैतन्य आणि सौंदर्याने तिला तिच्या काळातील शीर्ष अभिनेत्री बनवलं.
सायरा बानो यांनी वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी दिलीप कुमार, राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त यांसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम केलं. ‘गोपी’ आणि ‘बैराग’ या सिनेमांमध्ये सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. मोठ्या पडद्यावरील केमिस्ट्री देखील त्यांना प्रचंड आवडली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List