महायुतीकडून लोकशाही चिरडण्याचे काम, आदित्य ठाकरे यांचा हल्ला
राज्यात 2014 पासून लोकशाही चिरडण्याचे काम सुरू झाले आहे. संस्थांना संपवण्याचे काम सुरू आहे. लोकसभेत जनतेने निकाल दिला तोच निकाल चिरडण्याचे काम केले आहे. या सर्वांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी पहिल्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. ईव्हीएमच्या विरोधात आम्ही पाऊल उचलले आहे आणि त्याची सुरुवात लोकशाहीच्या लाँग मार्चने होणार आहे, असा इशारा शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दिला.
विजयाचा जल्लोष नाही
विधान भवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एखादे सरकार एवढ्या बहुमताने निवडून येते तेव्हा उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते, पण इथे कुठेही जल्लोष दिसत नाही. त्यामुळे हे जे बहुमत मिळाले आहे ते जनतेने दिले आहे, निवडणूक आयोगाने दिलेले बहुमत आहे की ईव्हीएमने दिलेले बहुमत आहे, असा प्रश्न मनात निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List