पराभव निश्चित असल्याने भाजपकडून कट कारस्थाने; बिटकॉइनप्रकरणी बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच आता बिटकॉइन प्रकरणाचा मुद्दाही चांगलाच गाजत आहे. माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन (बिटकॉइन) वापरणे तसेच निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी त्याचा वापर केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले असून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून कट कारस्थाने रचून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.यासाठी एका प्रकरणातील आरोपीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून प्रोजेक्ट करून त्याच्या तोंडून खोटे नाटे आरोप करवून घेतले जात आहेत. व त्या आधारे भाजप नेते माध्यमांसमोर जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बेफामपणे खोटे आरोप करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला भाजपच्या या कट कारस्थानाची आणि कपटनितीची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हे असले उद्योग करून भाजपला आपला पराभव टाळता येणार नाही. भाजपच्या या कारस्थानाला राज्यातील सुज्ञ जनता आज मतदानातून सणसणीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे थोरात यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून कट कारस्थाने रचून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
यासाठी एका प्रकरणातील आरोपीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून प्रोजेक्ट करून त्याच्या तोंडून खोटे नाटे आरोप करवून घेतले जात आहेत. व त्या आधारे भाजप नेते…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 20, 2024
तोडा, फोडा, झोडा ही भाजपची नीती महाराष्ट्रात चालली नाही. आता भाजपचा पराभव अटळ आहे. त्यामुळे आता ते कट कारस्थाने रचत आहेत. मात्र, राज्यातील सुज्ञ जनता त्यांना सणसणीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List