राम शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून कर्जतमध्ये पैसे वाटप, रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर करत केला आरोप
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून कर्जतमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी याशीसंबंधित काही व्हिडिओ आणि फोटोही आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केले आहेत.
पोस्ट शेअर करत रोहित पवार म्हणाले आहेत की, ”भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जतच्या लकी हॉटेलमधून पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आमच्याकडून दुपारी 2 वाजता प्रशासनाला देऊनही प्रशासनाने त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. तब्बल दोन तासांनी 4 वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला रंगेहात पकडलं.”
ते पुढे म्हणाले की, ”पैसे वाटप करणारी व्यक्ती ही मंगळवेढा येथील असून राम शिंदे यांचा नातेवाईक (अजून खोलात गेल्यास खूप काही पुढं येईल.) असल्याचं सांगत आहे. त्याच्याकडं 5 ते 8 लाख रुपये रोख रकमेसह लाखो रुपयांच्या याद्याही सापडल्या असून हा सर्व ऐवज पोलिसांकडं दिला आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करतं याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे.”
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जतच्या लकी हॉटेलमधून पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आमच्याकडून दुपारी २ वाजता प्रशासनाला देऊनही प्रशासनाने त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि तब्बल दोन तासांनी ४ वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप… pic.twitter.com/3qtKI03e2h
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List