एअर इंडियाचे 100हून अधिक प्रवाशी चार दिवसांपासून फुकेतमध्ये अडकले

एअर इंडियाचे 100हून अधिक प्रवाशी चार दिवसांपासून फुकेतमध्ये अडकले

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडिया विमानातील 100 हून अधिक प्रवाशी गेल्या चार दिवसांपासून फुकेटमध्ये अडकले आहेत. सर्व प्रवाशी फुकेतमधून नवी दिल्लीला चालले होते. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशी तेथेच अडकून पडले आहेत. यादरम्यान एअरलाईन्सकडून कोणताही मदत मिळाली नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 16 नोव्हेंबर रोजी रात्री फुकेतहून नवी दिल्लीसाठी फ्लाइटचे उड्डाण होणार होते. मात्र तांत्रिक समस्येमुळे सुरुवातीला सहा तास उशीर झाला. मग सहा तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, बोर्डिंगनंतर एक तासाने फ्लाइट अचानक रद्द करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना उतरण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, एअर इंडियाने एक निवेदन जारी करत फ्लाईट रद्द झाल्याची कबुली दिली आणि प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. विमानतळावरील आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमध्ये राहण्याची सोय आणि जेवण यासह सर्व ऑन-ग्राउंड मदत पुरवली, तर काही प्रवाशांना पर्यायी उपलब्ध फ्लाइट्समध्ये व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांना पूर्ण परतावा मिळण्याचे पर्यायही देण्यात आल्याचे एअर इंडियाने निवेदनात सांगितले.

एअर इंडियाने प्रवाशांना राहण्याचे आश्वासन दिले असले तरी, अनेक प्रवाशांनी हॉटेलची व्यवस्था आणि जेवण मिळण्यात विलंब आणि गोंधळ निर्माण झाल्याचे प्रवाशांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sharmila Thackeray : मला अमितचा मोठा विजय हवाय, छोटा विजय नकोय – शर्मिला ठाकरे Sharmila Thackeray : मला अमितचा मोठा विजय हवाय, छोटा विजय नकोय – शर्मिला ठाकरे
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहीममध्ये बिग फाईट आहे. माहिम विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...
‘माझ्या बाबाला…’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरे यांच्या नातवाचा क्यूट फोटो व्हायरल
सदा सरवणकर, अमित ठाकरे या तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर म्हणाले…
मुलीच्या नावावरून अभिनेत्रीला घाणेरडे मेसेज; वैतागून म्हणाली ‘मला अनफॉलो करा’
हिंदू असलेल्या ए आर रेहमान यांनी का स्वीकारला इस्लाम धर्म? घटस्फोटामुळे खासगी आयुष्य चर्चेत
Bigg Boss 18: बापरे आता हे काय? राशन मिळवण्यासाठी स्पर्धकांना खेळावा लागला किसिंग टास्क; टास्कनंतर प्रत्येकाचा विचित्र अनुभव
‘अशोक मा. मा.’ची आगळी वेगळी धमाल कथा; या तारखेपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला