पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावर हल्ला
पुण्यात विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले असून मतदानाच्या पूर्वसंध्येला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. महाविकास आघाडीचे वडगाव शेरीचे उमेदवार बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णालयात टिंगरे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. याप्रकरणी तपास करणाऱया पोलीस अधिकाऱयांची भेट घेऊन कारवाईची जलद तपासाची मागणी केली. पर्वती मतदारसंघातील बिबवेवाडी परिसरात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलवर चित्रीकरण केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List