उत्तर प्रदेशमध्ये सपाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची कारवाई; 7 पोलीस अधिकारी निलंबित
महाराष्ट्र झारखंडसह पाच राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या 15 जागांवरील आमदार खासदार झाल्याने या जागांसाठी मतदान होत आहे. या 15 जागांपैकी 9 जागा उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यामुळे येथील पोटनिवडणुकीसा महत्त्व आले आहे. या निवडणुका 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभेची रंगीत तालमी मानल्या जात आहेत. तसेच समाजवादी पक्षाने मतदानाबाबत तक्रार केल्याची दखल घेत निवडणूक आयोगाने 7 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
उत्तर पर्देशातील सीसामऊ, कुंदरकी या जागांवर वादावादी झाल्याची माहिती मिळत आहे. समाजवादी पक्षाने मतदान प्रक्रियेत गडबड होत असल्याची तक्रार निवडणूक आय़ोगाकडे केली. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने 7 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. कानपूरमधील सीसीमऊ येथील 2, मुरादाबादमधील 3 तर मुझफ्फरनगरमधील 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. समाजवादी पक्षाने मतदान करणाऱ्या जाणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे अधिकारी मतदात्यांना मतदानापासून रोखत होते, अशी तक्रार समाजवादी पक्षाने निवडणूक आय़ोगाकडे केली होती. तसेच काही ठिकाणी नागरिकांकडून ही अशी तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
अगर निर्वाचन आयोग का कोई जीता-जागता अस्तित्व है तो वो जीवंत होकर, प्रशासन के द्वारा वोटिंग को हतोत्साहित करने के लिए तुरंत सुनिश्चित करे:
– लोगों की आईडी पुलिस चेक न करे।
– रास्ते बंद न किये जाएं।
– वोटर्स के आईडी ज़ब्त न किये जाएं।
– असली आईडी को नक़ली आईडी बताकर जेल… pic.twitter.com/4Qddtlgc19— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 20, 2024
सीसामभ येथील भाजप उमेदवार सुरेश अवस्थी यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी भाजपने समाजवादी पक्षांवर आरोप केले आहेत. या घटनेनंतर सीसामऊमध्ये तणावाचे वातावरण होते. तर भाजपने याविरोधात काहीकाळ धरणे आंदोलनही केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List