लोकशाहीच्या उत्सवात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आयोगापुढे आव्हान

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आयोगापुढे आव्हान

लोकशाहीच्या उत्सवासाठी म्हणजेच उद्या होणाऱया  विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झाला आहे. राज्यात  9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्याच्या अनेक भागांत, खास करून शहरी भागात मतदानाची टक्केवारी घटली होती. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने जागृती केली आहे, पण तरीही मतदानाची टक्केवारी वाढण्याचे मोठे आव्हान आहे.

मतदानासाठी मोबाईल नेऊ नका

पेंद्र सरकार डिजीलॉकरला प्रोत्साहन देत आहे. मतदानासाठी ओखळपत्र सादर करावे लागते. पण मतदान पेंद्रात मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्यामुळे ऑनलाईन डिजिलॉकरचा काही उपयोग होणार नाही. 2008 च्या निवडणूक कायद्यानुसार मतदान पेंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी आहे; पण मतदान पेंद्रांच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या संबंधित निवडणूक अधिकारी किंवा स्थानिक पातळीवरील अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या आहेत, पण तशी व्यवस्था असेलच असे नाही. त्यापेक्षा मतदान पेंद्रावर जाताना मोबाईल नेऊ नका असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

एक  लाखाहून अधिक मतदान केंद्रे

राज्यभरात 1 लाख 427 मतदान पेंद्रे स्थापन केली आहेत. राज्यात सर्वाधिक मतदान पेंद्रे पुण्यात 8 हजार 462 मतदान पेंद्र आहेत. त्यानंतर मुंबईच्या उपनगरात 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955  नाशिक – 4 हजार 922,  नागपूर येथे  4 हजार 631 मतदान पेंद्रे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत शहरी भागातील मतदारांची अनास्था दिसली होती. त्यामुळे शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी पुणे, मुंबई, ठाणे शहरांमध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलांमध्ये 1 हजार 181 मतदान पेंद्रे उभारण्यात आली आहेत. झोपडपट्टी भागात 210 मतदान पेंद्रे उभारण्यात आली आहेत.

9  कोटी 70 लाख मतदार

राज्यातील 288 मतदारसंघांतील सुमारे 9,70,25,119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 5 कोटी 22 हजार 739, तर महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतक्या आहेत.

4 हजार 134 उमेदवार रिंगणात

निवडणुकीच्या रिंगणात एकूण 4 हजार 136 उमेदवार आहेत. त्यात 3 हजार 771  पुरुष, 363  महिला आणि तर अन्य 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक

राज्यात 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार  आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग जिह्यांत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक
आहे.

मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य

मतदानासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त पुढील अन्य 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल.

आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पासपोर्ट, निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड , भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड पंपन्यांनी कर्मचाऱयांना वितरित केलेले ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांचे ओळखपत्र, केंद्र सरकारचे दिव्यांगांसाठीचे विशेष ओळखपत्र.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Assembly Election Voting : 288 जागांसाठी आज मतदान; 4 हजार 136 उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला Maharashtra Assembly Election Voting : 288 जागांसाठी आज मतदान; 4 हजार 136 उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
पुणे जिल्ह्यात ८८ लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांना सहज सुलभ मतदान करता यावे, म्हणून जिल्हा प्रशासनाने...
Maharashtra Assembly Election 2024 Voting LIVE : जळगाव – जामोद मतदारसंघात स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर हल्ला
मतदानासाठी मालिकेतल्या कलाकारांना सुट्टी; वेतनकपात केली जाणार नाही
Maharashtra Assembly Election Live – महाराष्ट्रात 288 मतदार संघात मतदानाला सुरुवात
लक्षवेधक – स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
मुंबईत आवाज महाविकास आघाडीचाच…!
हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही! अनिल देशमुख यांचा भाजपला इशारा