‘मेटा’ला हिंदुस्थानात मोठा झटका, 213 कोटींचा दंड
मार्क झुकरबर्गची ‘मेटा’ कंपनी अडचणीत सापडली आहे. ‘मेटा’ कंपनीला 213.14 कोटींचा दंड ठोठावण्यात आला. वर्ष 2021 मध्ये व्हॉट्सऍपचे खासगी धोरण अद्ययावत करताना चुकीचे व्यवसायिक धोरण अवलंबल्यामुळे हा दंड लावण्यात आला. तसेच हिंदुस्थानी स्पर्धा नियामक आयोगाने (सीसीआय) ‘मेटा’ला स्पर्धा विरोधी व्यवहार थांबण्याचे निर्देश दिले. या संघर्षात आता ‘मेटा’ काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पण असाच संघर्ष उडाला तेव्हा ‘मेटा’ने हिंदुस्थानातून काढता पाय घेण्याचे संकेत दिले होते.
यावेळी सीआयआयने ‘मेटा’ला चांगलेच फटकारले. मेटाकडे फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सऍप आहे. सोशल मीडिया युझर्समध्ये इतरांपेक्षा मोठा शेअर आहे. या वर्चस्वाचा मेटाने गैरवापर केल्याचा आरोप स्पर्धा नियामक आयोगाने केला आहे. तीन वर्षांपूर्वी कंपनीने खासगी धोरण कसे लागू केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List