भाजपकडून निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे खुलेआम उल्लंघन, मतांसाठी भरमसाठ पैसै व दारु वाटप!

भाजपकडून निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे खुलेआम उल्लंघन, मतांसाठी भरमसाठ पैसै व दारु वाटप!

विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात नाना पटोले यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. तावडेंचा तो मतदारसंघ नसताना ते तेथे काय करत होते? कार्यकर्त्यांना भेटायला गेलो हा तावडेंचा बचाव चुकीचा आहे. प्रचार संपल्यानंतर मतदार संघाबाहेरच्या नेत्यांना थांबता येत नाही असा नियम आहे, त्यामुळे विनोद तावडे जे सांगत आहेत ते खोटे आहे.

आर्वी विधानसभेचे भाजप उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक आहेत, या वानखेडेंच्या गोदामात दारुच्या बाटल्यांचा साठा सापडल्या. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही हा दारु साठा कसा आला? मतदारांना पैसे व दारु वाटून भाजपाचा मते मिळवण्याचा प्रयत्न आहे.

Maharashtra Assembly Election Live – राज्यात 3 वाजेर्यंत 45.53 टक्के मतदान

लोकसभेत व्होट जिहाद झाल्याचा भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. एखाद्या जात समुहाने एका पक्षाला मतदान करा असे आवाहन केले तर त्याला भाजपा व्होट जिहाद म्हणतो. मतदान कोणाला करायचे हा मतदाराचा हक्क आहे. आता एका समाजाने भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, त्यालाही ‘जिहाद’ म्हणायचे का? असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 – सुप्रिया सुळे यांची सायबर सेलमध्ये तक्रार, भाजपला मानहानीची नोटीस पाठवणार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. दरम्यान मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप हा...
Exit Poll Results 2024 Maharashtra : मविआ आणि महायुतीतला मोठा भाऊ कोण? एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार जिंकणार? पाहा अंदाज
अजित पवार की शरद पवार? कोण पॉवर फुल्ल?, कुणाच्या वाट्याला किती जागा?; एक्झिट पोलने घाम फोडला
Maharashtra Exit Poll 2024 Results : राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष, दबदबा कायम? एक्झिट पोलने कुणाला धक्का?
Exit Poll Results 2024 : सत्ता परिवर्तनाला लाडक्या बहि‍णी आडव्या? योजनेचा महायुतीला फायदा? Exit Poll च्या आकडेवारीचा काय दावा
श्वेता तिवारी 8 वर्षांनी लहान अभिनेत्याशी केलं तिसरं लग्न? व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?
मतदानासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली भारतात; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हे खूपच दु:खद….”