Maharashtra Assembly Election – बीडमध्ये मतदानाला गालबोट, परळी मतदारसंघातील केंद्रात तोडफोड
राज्यात विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले आहे. बीडच्या परळी मतदारसंघातील घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ईव्हिएम मशीनचीही तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया काहीवेळासाठी ठप्प पडली होती.
बीडच्या परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची माहिती आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मिळाली होती. ते बोगस मतदान रोखण्यासाठी गेले असता माधव जाधव यांना चार ते पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. याच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
माधव जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्यानंतर घाटनांदुर गावात ईव्हीएम मशीन तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List