महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन निश्चित, शरद पवार यांना विश्वास; माळेगावमध्ये केलं मतदान
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बारामतीतील माळेगाव मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्रात नक्की सत्ता परिवर्तन होईल. महाराष्ट्रातील जनतेने मतदानाचा हक्क बजावावा. जो उमेदवार योग्य त्याला मतदान करा, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांच्यावर प्रचार सभेतून परतत असताना समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. देशमुखांवरील हल्ला अस्वस्थ करणारा असल्याचे पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपने बिटकॉईन स्कॅमचा आरोप केला आहे. यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेते नाना पटोले आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉईन विकून निवडणुकीत पैशांचा वापर केल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रविंद्रनाथ पाटील यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आरोप करणारा तुरुंगात राहिलेला व्यक्ती आहे. तुरुंगात असणाऱ्या व्यक्तीच्या आरोपांची नोंद घेण्याची गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी पवार लगावला.
‘माहितीशिवाय तावडेंवरील आरोपांवर बोलणं योग्य नाही’
विनोद तावडेंना बरीच वर्ष ओळखतो. माहितीशिवाय तावडेंवरील आरोपांवर बोलण योग्य होणार नाही, असे शरद पवार म्हणाले. बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर कॅश ऑन वोटचा आरोप केला. तावडे यांनी मतदारांना पाच कोटी रुपये वाटप केल्याचे ठाकूर पिता-पुत्राने म्हटले आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List