झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान, 528 उमेदवारांचे भविष्य ठरणार
झारखंडमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. विधानसभेच्या 81 पैकी 38 जागांसाठी मतदान सुरू आहे. 14,218 मतदान केंद्रांवर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. यापैकी 31 मतदान केंद्रांवर दुपारी 4 वाजता मतदान संपेल तर उर्वरीत मतदान केंद्रावर 5 वाजेपर्यंत मतदान होईल.
या विधानसभेत सत्ताधारी जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यात चुरशीची लढत आहे. दुसऱ्या टप्प्यात 528 उमेदवारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे.
एकूण मतदार किती?
दुसऱ्या टप्प्यात 60.79 लाख महिलांसह एकूण 1.23 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येथे एकूण 528 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 472 पुरुष, 55 महिला आणि एक ट्रान्सजेंडर आहे.
दरम्यान, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे 200 कोटी रुपयांचे अवैध साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाशी संबंधित 90 प्रकरणे नोंदवण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी के रवी कुमार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List