तावडेंचा काल भिजलेला कोंबडा झाला होता, मुंबईला गेल्यावर त्यांना कंठ फुटला; हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल

तावडेंचा काल भिजलेला कोंबडा झाला होता, मुंबईला गेल्यावर त्यांना कंठ फुटला; हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये होते. यावेळी तावडे यांनी पैसे वाटप केले. तसेच त्यांच्या खोलीत 5 कोटी होते, त्याच्यातील फक्त 10 लाख दाखवण्यात आले, असा आरोप बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. आता बुधवारी पुन्हा एकदा ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मला सोडवा, माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे काल करत होते. मला त्यांनी 25 फोन केले आहेत असा दावा केल्यानंतर बुधवारी पुन्हा एखदा हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. विनोद तावडे यांची अवस्था काल भिजलेल्या कोंबडी सारखी झाली होती, मला सारखं बोलावत होते, असे ठाकूर म्हणाले. विवांता हॉटेल आमदार हितेंद्र ठाकूर यांचा असल्याचा दावा विनोद तावडे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना माझं हॉटेल असेल तर हॉटेल माझ्या नावावर करून द्या, काहीही आरोप करू नये असा दमही ठाकूर यांनी दिला. हॉटेल माझे आहे तर माझ्या नावावर करून द्या,मी तावडे यांचा आभारी राहीन, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांनी आमची मतं वाढतील, असा दावा केला. त्यावर पाच कोटी वाटून झाले असतील, त्यामुळे असा दावा ते करत असल्याचा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Exit Poll Results 2024 : खरी शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टाअगोदर जनतेच्या न्यायालयात काय फैसला, अंदाज तरी काय? Exit Poll Results 2024 : खरी शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टाअगोदर जनतेच्या न्यायालयात काय फैसला, अंदाज तरी काय?
राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत मोठा उलटफेर दिसला. 2019 रोजी महाविकास आघाडी तर नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महायुतीचे सरकार...
मतदानाचा टक्का वाढला, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया काय ?
राज ठाकरे ठरणार किंगमेकर? एक्झिट पोलमध्ये मनसेचे किती जागांवर मारणार मुसंडी?
Exit Poll Results 2024 : खरी शिवसेन अन् राष्ट्रवादी कोणाची? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
श्रीवल्लीचा हॉट अंदाज; अभिनेत्री रश्मिका मंदानाचे साडीतले फोटो आहेत कहर
Brain Stroke : ब्रेन स्ट्रोकची ‘ही’प्रमुख लक्षणे, दुर्लक्ष केल्यास मृत्यूचा धोका
बाजाराची घसरण; 2 महिन्यात झुनझुनवाला यांना बसला 15 हजार कोटींचा फटका…